Onion Rate Today: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कवडीमोल भावाने विकला जाणारा कांदा आता तेजीत आला आहे. वाढती मागणी आणि पुरवठा कमी यामुळे कांद्याला विक्रमी भाव मिळतो. कांदा निर्यातीवर निर्बंध असतानाही सध्या देशांतर्गत कांद्याचे भाव तगडे आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज राज्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. या बाजारात कांद्याला आज कमाल 5000 रुपये भाव मिळाला आहे. या बाजारात आज कांद्याला किमान २५०० तर सरासरी ४३०० भाव मिळाला आहे. आता राज्यातील इतर बाजारपेठेतील दर पाहणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील बाजारभाव,Onion Rate Today
कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर : कांद्याला या बाजारात किमान १५००, कमाल ४४०० आणि सरासरी ३२०० रुपये मिळाला आहे भाव.
मुंबई कांदा बटाटा मार्केट : या बाजारात किमान ३३००, कमाल ३९०० आणि सरासरी ३६००ची आवक झाली आहे.
छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 2000, कमाल 4000 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान 700, कमाल 4500 आणि सरासरी 3500 असा भाव मिळाला.
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी, सोन्याच्या किमतीत किंचित अशी घसरण
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 2000, कमाल 4000 आणि सरासरी 3000 भाव मिळाला आहे.
अमरावती फळे व भाजीपाला मार्केट : या बाजारात कांद्याला किमान 3200, कमाल भाव 4800 आणि सरासरी 4000 भाव मिळाला.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे आज किमान भाव ३१०५, कमाल ३७६५ व सरासरी ३७०० होते.
सांगली फळे आणि भाजीपाला मार्केट : आज कांद्याला या बाजारात 2000,किमान, कमाल 4,200 आणि सरासरी 3100 भाव मिळाला आहे.(Onion Rate Today)
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती: येथे आज किमान दर 2500, कमाल 4000 आणि सरासरी 3250 आहे.