जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी एका दिवसात भरला आपला पिकांचा पिक विमा अर्ज, पहा शेवटची तारीख काय? Crop Insurance

Crop Insurance मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले असून शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड सुरू केली आहे.राज्यात जवळपास 5 ते 6 टक्के पेरण्या झाल्या असून बहुतांश भागात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केलेली नाही. 75 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी सुरू करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत.

दरम्यान, शासनाने 50 हजार रुपयांची पीक विमा योजना लागू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठीच खर्च करावा लागत आहे. तसेच खरीपातील 14 पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.मृग बहार आणि अंबिया बहारमधील फळपिकांसाठीही पीक विमा योजना मंजूर करण्यात आली आहे.  या हंगामात पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली असून काही दिवसांत तब्बल 2 लाख 47 हजार 802 शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 18 हजार 350 शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत. बहुतांश ठिकाणी पेरणी व मशागतीची कामे पूर्ण झाली नसल्याने पीक विम्याचे अर्ज आले नसल्याची माहिती आहे. 

गेल्या वर्षी खरीप हंगामात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.यावर्षी 15 जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असून तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीनंतर पीक विम्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. Crop Insurance

Crop Insurance

Leave a Comment

Close Visit Marathinews360