शासनाचा मोठा निर्णय पहा युरिया डीएपी खताची मागणीत केली वाढ Increase in demand of Urea DAP

Increase in demand of Urea DAP देशभरात तसेच राज्यात मान्सून सक्रीय झाला असून विविध भागांत जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खते व बियाणांची खरेदी केली आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून (डीएपी) आणि युरिया खताची मागणी वाढली आहे. त्यामुळे खताचा पुरवठा योग्य न झाल्यास तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

खताच्या मागणीत वाढ झाल्याने आवश्यक ठेवींचा पुरवठा कमी होतो आणि किंमती वाढू शकतात. शेतकऱ्यांना वेळेवर खते व बियाणे न मिळाल्यास त्याचा मोठा परिणाम कृषी उत्पादनावर होऊन अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. ही परिस्थिती राज्यभरात उद्भवू नये यासाठी पणन महासंघाच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.Increase in demand of Urea DAP

या बैठकीत पवार यांनी पणन महासंघाला खतांचा साठा योग्य पद्धतीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बैठकीत वाढीव डीएपी व युरियाची मागणी करण्यात आली असून कृषी विभागामार्फत वाढीव कोटा मंजूर करण्याच्या सूचना पणन महासंघाला देण्यात आल्या आहेत. खरीप हंगामात खताचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जास्तीत जास्त साठा तयार करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

राज्यात खतांचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात खताच्या वाढलेल्या मागणीनुसार आणखी कोटा मंजूर करून खताचा पुरवठा सुरळीत होईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन कृषी उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे.Increase in demand of Urea DAP

Increase in demand of Urea DAP

Leave a Comment

Close Visit Marathinews360