किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; Kisac Credit Card (KCC) apply

Kisac Credit Card KCC | किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 | Loan Scheme 2023 Kisan Credit Card | (KCC) Kisan Credit Card Scheme | लाभार्थी लिस्ट KCC, किसान क्रेडिट कार्ड | Registration Kisan Credit Card Yojana | ऑनलाइन अर्ज किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 | Yojana Kisan Credit Card

भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वेळेवर गरज असताना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध. 1998 मध्ये आपत्कालीन औपचारिक कर्ज देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना चालू करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना या KCC च्या मदतीमुळे, किसान क्रेडिट कार्ड साठी 2% इतका कमी व्याजदर व 4% सरासरी पासून सुरू झाल्यामुळे बँकेच्या माध्यमातून रोजच्या रोजच्या ऑफर केले जाणाऱ्या कर्जाच्या जास्त असलेल्या शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात सुट मिळते.

किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांकरिता लवकरात लवकर आणि वेळेवर कर्ज मिळवण्याचे प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने ही योजना आणली आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्याला खत बी बियाणे कीटकनाशक इत्यादी कृषी संबंधित सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी मदत होईल. आणि ही KCC योजना लघु वित्त बॅंका, वाणिज्य बँका आणि सहकारातील संस्था यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

या KCC योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला बँकेकडून नियमित दिले जाणारे कर्ज त्याचे जास्त असलेले व्याजदर यामधून सूट दिली जाते. KCC साठी व्याजदर हा 2% – 4% एवढा कमी आहे. हा कमी व्याजदर शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या दृष्टीने खूपच चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत होईल. यामध्ये कर्ज दिलेली तारीख आणि पीक काढण्याचा कालावधी हे लक्षात घेऊनच किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या अंतर्गत दिले जात आहे. आणि ह्याच्या मध्ये शेतकऱ्याला जवळपास 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. आणि ह्या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करू शकतात आणि त्यांच्या पिकांची काळजी घेऊ शकतात. त्याचबरोबर ह्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विमा ही काढता येईल.

आत्ताच भारत सरकारने मच्छीमारांचा आणि पशुपालक यांचाही समावेश हा किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत केला आहे. जर शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड काढायचे असल्यास त्यांना शासनाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावा लागेल. आणि मग हे किसान क्रेडिट कार्ड ची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना क्रेडिट कार्ड प्राप्त होईल. या किसान क्रेडिट कार्ड योजनेत कुठल्याही हमीशिवाय चार टक्के व्याजदराने कर्ज हे शेतकऱ्यांना दिले जात आहे.

Table of Contents

भारत देशातील सर्व भारतीय बँका ग्रामीण बँका प्रादेशिक बँका आणि सहकार संस्थेतील बँका यांच्यामार्फत KCC सर्व उपलब्ध आहे. या किसान क्रेडिट कार्ड योजनेत 2012 मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली, त्यामध्ये यामध्ये प्रक्रिया सुलभ करणे आणि किसान क्रेडिट कार्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करणे सुलभ झाले आहे. यामध्ये सामान्यता अनौपचारिक माहिती व बँकेची प्रक्रिया नसलेले शेतकऱ्यांसाठी एक साधी कागदपत्रे व वितरण क्रेडिट कार्ड प्रक्रिया सोपी केली आहे.

Highlight of Kisac Credit Card

 • योजनेचे नाव – किसान क्रेडिट कार्ड.
 • कोणी सुरू केली – भारत सरकारने.
 • कधी सुरू झाली – 1998
 • कोण लाभार्थी आहेत – भारत देशातील शेतकरी.
 • अधिकृत वेबसाईट – https://pmkisan.gov.in/
 • योजनेचा उद्देश – देशातील शेतकऱ्यांसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते आहे.
 • योजना लाभ – शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी करून शेतकऱ्याला सक्षम आणि क्रेडिट उपलब्ध करून देणे.
 • योजनेचा विभाग – कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग.
 • या योजनेत किती कर्ज मिळते – 3 लाख पर्यंत कर्ज मिळते परंतु (अधिक कर्ज घेतल्यास) व्याजदर जास्त लागतो.
 • व्याजाचा दर – 7% 3.लाखांपर्यंत.
 • योजनेची अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन/ऑनलाईन.
 • योजनेची श्रेणी – केंद्र सरकार
 • योजनावर्ष – 2023

नवीन व्याजदर किसान क्रेडिट कार्ड योजना

1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली. कोविडच्या संक्रमणामुळे त्या काळात सरकारकडून नवीन व्याजदर हा किसान क्रेडिट कार्ड यासाठी जाहीर करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी एका विशेष मोहिमेच्या अंतर्गत चित्रकूट जिल्हा उत्तर प्रदेश येथील 25 लाखाहून अधिक किसान किसान क्रेडिट कार्डचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे. ज्यामध्ये जवळपास दोन हजाराहून जास्त बँक यांना हे क्रेडिट कार्ड देण्याचे काम सोपवले होते. किसान क्रेडिट कार्ड यामध्ये पिक व क्षेत्रासाठी विमा देखील उपलब्ध आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेतील उद्देश

शेतकऱ्यांना सर्व कर्जाच्या गरजा त्यांच्या पीक लागवडीकरिता आणि खालील दिलेल्या प्रमाणे इतर अनेक गरजा वेळेवर क्रेडिट मिळवून देणे आहे.

 • पीक लागवडीसाठी कर्जाची आवश्यकता पूर्ण करणे.
 • पिक काढणे नंतरचा खर्च.
 • विपणन कर्ज तयार.
 • शेतकऱ्याच्या वापराच्या गरजा पूर्ण करणे.शेतकऱ्याला शेतीमाल बघण्यासाठी खेळते भांडवल शेताशी निगडित असलेले क्रिया कपाल ज्यामध्ये प्राणी मत्स्यपालन आणि तसेच फुलशेती इत्यादी उत्पादनासाठी आवश्यक खेळते भांडवल.
 • मासे,प्राणी,पक्षी,कोळंबी इतर जलचर यांच्या संगोपन यासाठी आपत्कालीन कर्जाची आवश्यकता.

KCC च्या माध्यमातून पात्रता व क्रेडिट मर्यादा

पात्रता

सर्व शेतकरी बांधव आणि संयुक्त कर्जदार जे शेती करणारे आहेत ते.तोंडी भाडेपट्टेदार,भाडेकरू शेतकरी आणि शेअर क्रोपर्स इ.

KCC चे वैशिष्ट्ये

पिक विमा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मालमत्ता विमा अपघात विमा आणि आरोग्य विमा चा लाभ घेण्याचा पर्याय हा किसान क्रेडिट कार्ड धारकाला असावा. उपलब्ध विमा संरक्षणाची जाणीव ही शेतकरी बांधवांना करून द्यायला हवी

पात्रता आणि निकष KCC

 • कर्जदाराचे वय 18 ते 75 वर्षांपर्यंत असावे.
 • वैयक्तिक शेतकरी तेच शेती करणारे आहेत.
 • वाटेकरी आणि भाडेकर शेतकरी.
 • पीक उत्पादनात सहभागी असलेले शेतकरी.
 • स्वयंसहाय्यता गट मत्स्यपालन मच्छीमार इत्यादी प्रकारचे शेतकरी.
 • दूध व्यवसाय करणारे शेतकरी आणि इतर.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

 1. अर्जाचा नमुना.
 2. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
 3. आयडी ओळखपत्र. ज्यामध्ये आधार कार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र.
 4. पत्त्यासाठी पुरावा ड्रायव्हिंग लायसन.
 5. आधार कार्ड.
 6. रीतसर केलेले जमीन धारणेचा पुरावा व इतर कोणताही मंजुरी नुसार दस्ताऐवज.

KCC योजनेत ऑफलाईन अर्ज कसा करावा?

या योजनेत ज्या शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे. त्यांनी एक अर्ज करायचा आहे. तुम्हाला तुमचे सर्व प्रकारचे कागदपत्र घेऊन तुमच्या जवळच्या कुठल्याही एखाद्या बँक शाखेत जाऊन बँकेमध्ये किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याचा अर्ज मिळवावा लागेल. बँकेमध्ये तो फॉर्म भरवल्याच्या नंतर त्यासोबत सर्व प्रकारची कागदपत्रे जोडून बँकेच्या अधिकाऱ्याकडे देऊन त्या अर्जाची पडताळणी केली जाईल. मग ठराविक दिवसाच्या नंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध होईल किंवा देण्यात येईल.

KCC योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा

शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे ऑनलाइन मिळवायचे असल्यास शेतकऱ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर आपली सर्व माहिती भरून.

अधिकृत वेबसाईटवरयेथे क्लिक करा
KCC Application Form PDFयेथे क्लिक करा

FAQ किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी किती खर्च येईल?

किसान क्रेडिट कार्ड फाईल बनवण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो.

किसान क्रेडिट कार्ड ला लिमिट किती आहे?

या किसान क्रेडिट कार्ड ला 3 लाख पर्यंत एवढी लिमिट आहे.

किसान क्रेडिट कार्डचा चे नियम?

शेतकऱ्याचे वय 18 ते 75 पर्यंत असावे. स्वतः शेतकरी असावा.

किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी काय करावे?

किसान क्रेडिट कार्ड साठी आधार कार्ड,पॅन कार्ड,बँक पासबुक,मतदार ओळखपत्र त्याचा पुरावा हे सर्व काग द तयार ठेवावी.

5 लाख रुपये पर्यंत किसान क्रेडिट कार्ड लोन वर व्याजदर किती आहे?

शेतकरी तीन वर्षात पाच लाख पर्यंत लोन घेऊ शकतात. आणि त्याचे व्याजदर 4% पर्यंत प्रती वर्ष आहे.

किसान क्रेडिट कार्ड साठी कोण कोण पात्र आहे?

भारत देशातील सर्व शेतकरी असतील.

Kisac Credit Card

Leave a Comment

Close Visit Marathinews360