Ladki bahin new list: लाडकी बहीण योजनेचे 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 1500 हजार रुपये
आदिती तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, दुसऱ्या टप्यातील लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा नागपूरमध्ये कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून या योजनेत अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहे. सध्या ऑगस्ट महिन्याचे अर्जाची छाननी सुरु आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात 45-50 लाख महिलांना पैसे मिळणार आहे असं माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या.
तसेच महिलांवर राज्यात होणाऱ्या अत्याचाराविरोधात एक समिती स्थापन करण्याबाबत मंत्री मंडळाच्या बैठकीत आज नुकतीच चर्चा ही झाली असून, या अशा प्रकरणामध्ये कोणताही आरोपी सुटला जाणार नाही याकरिता प्रयत्न प्रयत्न हे मोठया प्रमाणात करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. बदलापूरची घटना एक अतीशय निंदनीय प्रकारची असून पुढे असं काहीही होऊ नये यासाठी एक जिआर देखील शालेय शिक्षण विभागाने आणलेला आहे. जर असे कृत्य हे शिक्षकांकडून झाले तर कडक कारवाई त्याच्यावर करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे अशा प्रकारची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच पुढे त्यांचे निलंबन जरी झाले तर त्यांना त्याचा निकाल येईपर्यंत कुठलाही लाभ हा त्या व्यक्तीला मिळू नये अशी देखील तरतूद यामध्ये करण्यात आलेली ही आहे असेही माहिती माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ह्या म्हणाल्या.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
बदलापूरप्रकरणात दुसरीकडे राज्य सरकारने देखील मोठी कारवाई ही करत गुन्हा हा दाखल करण्यास दिरंगाई केल्यामुळे तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबित कारवाई केले आहे तसेच या प्रकरणामध्ये शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र यांनी ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकारी यांच्यावर (Thane) निलंबित देखील केले असल्याची माहिती ही यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर साहेब यांनी दिली ही आहे. सध्या या प्रकरणाच्या तापासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थानप केली आहे.(Ladki bahin new list)