राज्यामध्ये पुढील दोन दिवस जोरदार असा पाऊस, हवामान खात्याने दिला अंदाज Maharashtra Rain

Maharashtra Rain पुढील तीन-चार दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात आणखी पावसाची शक्यता आहे.

उद्या, शुक्रवारी (ता. 5) विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्हेही यलो अलर्टवर आहेत. मराठवाड्यात मात्र हलका पाऊस अपेक्षित आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. 6) आणि रविवारी (ता. 7) विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे, तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली आणि खान्देशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.Maharashtra Rain:

गुरुवारी राज्यात पाऊस झाला

  • पुणे : ०.२ मिमी
  • जळगाव : ९ मि.मी
  • महाबळेश्वर : १७ मिमी
  • सांगली : ०.१ मिमी
  • सातारा : ०.४ मिमी
  • मुंबई : ०.८ मिमी
  • अलिबाग : 7 मिमी
  • रत्नागिरी : ३ मिमी
  • अमरावती : १ मिमी
  • गोंदिया : ३ मिमी
Maharashtra Rain:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Marathinews360