जगातील पहिली CNG बाईक असणार या 3 मॉडेलमध्ये किंमत देखील कमी पहा लगेच महाराष्ट्रात झाली विक्री सुरू New CNG Bike

New CNG Bike पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींपासून वाचण्यासाठी ग्राहक ईव्हीकडे वळले आहेत. इलेक्ट्रिक (EV) वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत आहे आणि चारचाकी वाहनांसह दुचाकींची विक्री लक्षणीयरीत्या वाढत आहे. गेल्या 2 वर्षांत, EV बाईक मालकांची संख्या वाढली आहे आणि ही बाईक प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आता बजाज ऑटो (बजाज) कंपनीने ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. कारण, आतापर्यंत फक्त चारचाकी वाहनांमध्ये उपलब्ध असलेला सीएनजी पॅटर्न आता दुचाकींमध्येही सुरू करण्यात आला आहे. बजाज कंपनीने जगातील पहिली दुचाकी लाँच केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठमोळा ग्राहकही आजपासून ही बाईक खरेदी करू शकतात. 

भारतातील पहिली सीएनजी बाइक, बजाज फ्रीडम पिंपरी चिंचवडमध्ये रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी बजाज कंपनीकडून बाइकच्या किमतीबाबत अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. या बाईकची किंमत एक लाख रुपयांच्या आत असावी, असे गडकरी म्हणाले होते. विशेष म्हणजे बजाज कंपनीनेही मंत्र्यांच्या शब्दाला मान देत या सीएनजी बाइकची किंमत मंत्र्यांच्या अपेक्षेप्रमाणेच ठेवली आहे.त्यानुसार ग्राहकांना ही सीएनजी बाईक तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये ९५ हजार ते १ लाख १० हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. New CNG Bike

📢 हे पण वाचा…आता तुम्हाला कमी किमतीत मिळणार KTM Duke 390 Bike स्पोर्ट बाईक, जाणून घ्या तिची वैशिष्ट्ये

2 किलो CNG वर सरासरी 230 किमी

बजाज कंपनीने या पहिल्या-वहिल्या CNG बाईकची निर्मिती केली असून तिचा लॉन्चिंग सोहळा आपल्याच महाराष्ट्रात पार पडला. ही CNG प्लस पेट्रोल हायब्रिड बाइक आहे. ही बाईक 2 किलो CNG आणि 2 लिटर पेट्रोलवर 330 किमी अंतर कापते. तर, सीएनजीच्या 2 किलोच्या टाकीवर ते 230 किमीची श्रेणी गाठते. त्यामुळे ग्राहकांना CNG आणि पेट्रोल या दोन्हींचा वापर करून या बाईकच्या परवडणाऱ्या राइडचा आनंद घेता येईल. New CNG Bike

3 मॉडेल, परवडणारी किंमत

वेगवेगळ्या रंगांच्या तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध असलेल्या या बाइकची किंमत 95 हजार ते 1 लाख 10 हजारांपर्यंत आहे. विशेष म्हणजे ही बाईक आजपासून महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे सीएनजी बाईक घेण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकांना लवकरच सीएनजी बाईक खरेदी करता येणार आहे. 

📢 हे पण वाचा…फक्त 10 मिनिटात 5 हजार ते 50 हजार पर्यंत ही बँक देते प्रश्न लोन त्वरित करा असा अर्ज.

राजीव बजाज यांना गडकरींकडून अपेक्षा आहेत.

या बाईकच्या लाँचिंगवेळी बोलताना राजीव बजाज म्हणाले की, सीएनजी बाईक ही ‘बजाज गॅरंटी’ आहे असे आपण म्हणू शकतो. नितीन गडकरींच्या वचनाचाही तुम्ही तुमच्या भाषणात उल्लेख करावा, अशी अपेक्षा राजीव बजाज यांनी व्यक्त केली.देशभरात सीएनजी पंपांचा तुटवडा आहे, या सीएनजी पंपांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवायला हवी. त्यानुसार राजीव बजाज यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे बजाजने सीएनजी बाईकची हमी दिली असली तरी सीएनजी पंपांची संख्या लक्षात घेता वाहनधारकांना अधिक सीएनजी पेट्रोल पंपांची गरज भासेल.New CNG Bike

New CNG Bike

Leave a Comment

Close Visit Marathinews360