केवळ राज्य कर्मचाऱ्यांनाच जुने निवृत्तिवेतन लागू होणार | Old pension scheme

Old pension scheme जुना लोकमत न्यूज नेटवर्क फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेला पेन्शन निर्णय फक्त राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू आहे. या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद व अन्य प्राधिकरणांना मिळणार नसल्याची चिंताजनक माहिती वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे यांनी दिली आहे.

या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेतून निवडलेले; परंतु 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय वित्त विभागाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला आहे.(Old pension scheme)

यापैकी इच्छुक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांत ही योजना राबविण्याचा पर्याय सादर करायचा आहे. हा पर्याय न देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे

📢 हे पण वाचा महत्त्वाचं…शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी.. शेतामधील मोटार आता कधीच जाणार नाही, फक्त हा एक उपाय करा Electric water pump

परंतु हा कल्याणकारी निर्णय जिल्हा परिषद व अन्य प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू नसल्याचे स्पष्टीकरण वित्त विभागाने दिले आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती.

यासंदर्भातील निर्णय वित्त विभागाने 31 ऑक्टोबर 2005 रोजी जारी केला होता, त्यात बदल करून नवीन निर्णय जारी करण्यात आला आहे.(Old pension scheme)

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेतून निवडलेले; परंतु 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

दरम्यान, संबंधित निर्णय विल्स विभागाने जारी केला असल्याने हा निर्णय याचिकाकर्त्यांना लागू आहे का, अशी विचारणा न्यायालयाने 5 फेब्रुवारी रोजी केली. त्यामुळे वित्त विभागाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. या खळबळजनक खुलाशामुळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी न्यायालयात होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ ॲड. प्रदीप क्षीरसागर बाजू मांडणार आहेत.Old pension scheme

पुढे वाचा...

Old pension scheme

Leave a Comment

Close Visit Marathinews360