अवकाळी पाऊस व गारांची शक्यता ही आजही..! पहा लगेच हवामान खात्याचा संपूर्ण आजचा अंदाज..Rain Alert

Rain Alert नमस्कार मित्रांनो, मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर तसेच देशाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहू लागले.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत. आजही देशाच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली आहे. पावसामुळे वातावरण ढगाळ झाले आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यास त्याचाही परिणाम हवामानावर होणार असून पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.Rain Alert

राज्यात अजूनही अवकाळी पाऊस सुरूच आहे

वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागात कोसळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. काही भागात जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसामुळे थंडी वाढली असून काही भागात धुके दिसून येत आहे. IMD च्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत पुण्यासह अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोली येथे पाऊस पडेल.Rain Alert

अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीमुळे पिके व बागांचे नुकसान झाले आहे. गहू, बाजरी, लिंबू, खरबूज या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Rain Alert

📢 हे पण वाचा महत्त्वाचं…शासनाने गावासाठी पैसे दिलेले सरपंचाने कुठं कुठं खर्च केले, पहा येथे लगेच सर्व कुंडली

‘या’ भागात पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरुणाचल प्रदेशात आज मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी किंवा हिमवृष्टी होऊ शकते. हिमाचल प्रदेशात देखिल पावसासोबत बर्फवृष्टी ही होण्याची अशी शक्यता हवामान खात्याने ही वर्तवली आहे. मध्य प्रदेशात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.Rain Alert

Rain Alert

Leave a Comment

Close Visit Marathinews360