जोरदार असा पाऊस राज्यामध्ये 25 जून पासून बरसणार, पहा तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट Rain update Maharashtra

Rain Update Maharashtra “महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुण्यात रविवारी संध्याकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आता हवामान खात्याने (IMD) वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. 25 ते 27 जून दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मान्सूनचे कोकणात ६ जूनलाच आगमन झाले. त्यानंतर पुण्यात ८ जूनला आणि मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ९ जूनला मान्सून दाखल झाला. मात्र मान्सूनचा वेग मंदावला होता. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून सुटकेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात दाखल झाल्यानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

या आठवड्यात मुसळधार पाऊस राज्यात आता मान्सूनचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल बदल दिसून आला आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार मंगळवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 25 ते 28 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.

केरळमध्ये यंदाही मान्सून दाखल झाला आहे.मात्र, महाराष्ट्रात मुंबईसह अन्य भागात अजूनही पावसाचा जोर दिसत नाही. त्यामुळे लोक पावसाची वाट पाहत आहेत.Rain Update Maharashtra

Rain Update Maharashtra

Leave a Comment

Close Visit Marathinews360