Rain Update Maharashtra: राज्यामध्ये पुढचे तीन दिवस कसे असणार वातावरण.? काही जिल्ह्यांमध्ये तुफान असा पाऊस, फक्त येथे हलकासा पाऊस

Rain update Maharashtra राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी कोकणपट्ट्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

मराठवाड्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही पुढील पाच दिवस हलका पाऊस पडणार असून उत्तर महाराष्ट्रातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

20 ते 22 तारखेपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यांसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.Rain update Maharashtra

Rain Update Maharashtra

Leave a Comment

Close Visit Marathinews360