‘या’ बाजारात सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक दर, सोयाबीन बाजार भावात विक्रमी वाढ, Soyabean Market Maharashtra

Soyabean Market Maharashtra सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामातील पिके घेतली जात आहेत. सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांच्या लागवडीने वेग घेतला आहे. दरम्यान, या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हणजेच सोयाबीनचे बाजारभाव वाढले आहेत. ज्यांनी नुकतीच सोयाबीनची लागवड केली आहे त्यांना या दरवाढीचा लाभ मिळणार नाही.

मात्र, विजयादशमीपासून बाजारात येणारा नवीन माल त्याच भावात कायम ठेवता येईल, असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील सोयाबीनच्या सध्याच्या किमतींची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

राज्यात सोयाबीनचा भाव काय?

लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 3000, कमाल भाव 4,446 आणि सरासरी 4,400 भाव मिळत आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान भाव ४५००, कमाल भाव ४५२३ व सरासरी ४५१२ भाव मिळाला.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात काल झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान ४१८० रुपये, सरासरी ४३८५ रुपये तर कमाल ४४६० रुपये भाव मिळाला.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात काल झालेल्या लिलावात सोयाबीनचा किमान भाव 4 हजार 300, कमाल भाव 4 हजार 411 तर सरासरी भाव 4 हजार 355 इतका होता.

लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात पिवळ्या सोयाबीनला किमान 4100, कमाल 4400 आणि सरासरी 4250 असा भाव मिळाला.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात पिवळ्या सोयाबीनला किमान भाव 4000, कमाल भाव 4480 आणि सरासरी 4395 भाव मिळाला.Soyabean Market Maharashtra

Leave a Comment

Close Visit Marathinews360