ब्लड कॅन्सर हा कसा होतो? प्रथम कोणती लक्षणे हि शरीरात दिसतात? दुर्लक्ष न करता पहा लगेच संपूर्ण माहिती Symptoms of Blood Cancer

Symptoms of Blood Cancer कर्करोग हा मानवांकरिता सर्वात घातकी असा हा आजार म्हणून ओळखला देखील जातो. हा असा एक आजार आहे की ज्यामध्ये लोकांची जगण्याची असणारी शक्यता ही खूप कमी असते. परंतु वेळीच यावर योग्य असे उपचार हे सुरू केल्याने हा आजार बरा देखील होऊ शकतो.

कर्करोग हा एक अतिशय घातक आजार आहे. लोकांना या आजाराची खूप भीती वाटते. कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. जेव्हा शरीरात असणाऱ्या पेशी ह्या असामान्यपणे वाढू लागतात तेव्हा हा कर्करोग आपल्याला होतो.

कर्करोगाचे प्रकार हे अनेक आहेत व त्यांची लक्षणे हि देखील भिन्न असे आहेत. आज आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सरची लक्षणे सांगणार आहोत. या कर्करोगाला हेमेटोलॉजिकल मॅलिग्नन्सी असेही म्हणतात. त्यामुळे या ब्लड कॅन्सरची तुम्हाला लक्षणे सविस्तरपणे जाणून घेणे हेही आवश्यक आहे.Symptoms of Blood Cancer

वारंवार थकवा

काही वेळा नीट न खाल्ल्याने किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला वारंवार थकवा जाणवू शकतो. पण तुम्हाला सतत जर थकवा हा जाणवत असेल तर तुम्हाला ते ब्लड कॅन्सरचे हे लक्षण असू शकते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमियाची समस्या देखील उद्भवते.

अचानक वजन कमी होणे

जेव्हा कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढतात तेव्हा चयापचय बदलते. ज्यामुळे अचानक वजन कमी होते. हे ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.

वारंवार आजारी पडणे

सतत जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या असणाऱ्या संसर्गाचा धोका हा असेल तर डॉक्टरांचा सल्लाहा नक्कीच घ्या. रक्त कर्करोगाच्या बाबतीत, शरीरात WBC ची कमतरता असते, ज्यामुळे रुग्णाला वारंवार संसर्ग होण्याची शक्यता असते.Symptoms of Blood Cancer

सुजलेल्या लिम्फ नोड्स

सूजलेल्या लिम्फ नोड्सची अनेक कारणे असू शकतात. लोक सहसा या सूजकडे दुर्लक्ष करतात, परंतु जर तुम्हाला तुमच्या मानेमध्ये किंवा अंडरआर्म्समध्ये दुखत असेल तर लगेच तपासा.

हाडांमध्ये वेदना

रुग्णाला सतत पाठदुखी किंवा बरगड्यांमध्ये वेदना होऊ शकतात. ही ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात. तुम्हालाही सतत वेदना होत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

अगदी किरकोळ कारणांमुळेही जखमा होतात आणि रक्तस्त्राव सहज होतो

किरकोळ दुखापतीनंतर बराच काळ रक्तस्त्राव होत राहिल्यास हे लक्षण रक्ताच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते. हिरड्यांमधून रक्त येणे हे देखील रक्त कर्करोगाचे लक्षण असू शकते.Symptoms of Blood Cancer

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360