पुढील चार दिवस पडणार अति मुसळधार पाऊस या जिल्ह्यानमध्ये.! Weather forecast Maharashtra

Weather forecast Maharashtra मुख्य हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी जाहीर केले की, महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.

लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, अशी माहिती त्यांनी दिली. हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र हवामान अंदाज

9/जून, 10/जून आणि 11/जून दरम्यान राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यातील रायगड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, सांगली, सातारा, रत्नागिरी, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये ९ जून रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी माती चांगली ओली झाल्यानंतर पेरणी करावी आणि पहिल्या पावसात पेरणीची घाई करू नये.Weather forecast Maharashtra

Weather forecast Maharashtra

Leave a Comment

Close Visit Marathinews360