राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय, पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना आता मोफत उपचार मिळणार white ration Card Mofat upachar

white ration Card Mofat upachar उत्तम आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क आहे. हे लक्षात घेऊन लोकांच्या आरोग्यावरील खर्च कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. महाराष्ट्रात महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नागरिकांना मोफत उपचार देतात. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकारने आता आणखी एक पाऊल टाकले आहे. पांढऱ्या शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. या अधिसूचनेनंतर आता पांढऱ्या रंगाचे शिधापत्रिका असणाऱ्यांनाही जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याच्या सूचना 

महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मुंबईतील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि उपनियंत्रक शिधावाटप विभागांना पांढऱ्या शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पांढरे शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी आधार क्रमांकाशी शिधापत्रिका लिंक करणे आवश्यक आहे. white ration Card Mofat upachar

दोन्ही योजना एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 25 फेब्रुवारी 2019 च्या आदेशानुसार, या दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 28 जुलै 2023 रोजी राज्य सरकारने आणखी एक आदेश जारी करून पांढरे शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर केले. या आदेशाची आता अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी पांढऱ्या शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनेतून रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.white ration Card Mofat upachar

white ration Card Mofat upachar

Leave a Comment

Close Visit Marathinews360