Soyabean Market: सोयाबीन हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उत्पादित होणारे महत्त्वाचे नगदी पीक आहे. या तेलबिया पिकाचे उत्पादन मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये होते. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के आहे. तसेच मध्य प्रदेश राज्याचा वाटा ४५ टक्के आहे.
मात्र, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सध्या सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे पिकासाठी झालेला खर्चही भरून निघत नाही. विशेष म्हणजे ही परिस्थिती आता निर्माण झाली नसून गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन बाजारात मंदीचे सावट आहे.
त्यामुळे अनेक सोयाबीन उत्पादक कर्जबाजारी झाले आहेत. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात सोयाबीनला ४८९२ रुपये प्रतिक्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. वास्तविक, मध्यप्रदेशातील बाजारपेठेत प्रति क्विंटल 4150 रुपये आणि महाराष्ट्राच्या बाजारपेठेत 4185 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.(Soyabean Market)
⛈️आज आणि उद्या पावसाचा जोर, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता.?
त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सरकारच्या काही धोरणात्मक निर्णयांचा परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर होत आहे. सध्या देशात क्रूड पाम, सोयाबीन, सूर्यफूल तेलाच्या आयातीवर 5.5 टक्के आणि रिफाइंड तेलावर 13.75 टक्के आयात शुल्क लागू आहे.
कृषी तज्ज्ञ आणि प्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, सध्या खाद्यतेलावरील अत्यंत कमी आयात शुल्कामुळे देशात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आवक होत असून,(Soyabean Market)त्यामुळे तेलबिया शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. .
त्यामुळे खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतात खाद्यतेलाची आयात सुरूच आहे. परिणामी भुईमूग, सोयाबीन या तेलबियांना बाजारात फारसा भाव मिळत नाही.
कापसाचे भाव यंदा तरी वाढतील का? समोर आली मोठी माहिती
मात्र कृषी मंत्रालयाने खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, आयात शुल्क किती वाढवायचे याबाबत कृषी मंत्रालयाने काहीही सांगितलेले नाही.कृषी मंत्रालयाने यावेळी निर्देश दिले आहेत
मात्र, येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, यासंदर्भातील निर्णय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीत घेतला जाईल. यामुळे केंद्र सरकार कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ करणार का, हे पाहणे बाकी आहे.
खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ झाल्यास तेलबिया उत्पादक शेतकरी आणि तेलबिया प्रक्रिया उद्योगाला दिलासा मिळेल. त्यामुळे नजीकच्या काळात सोयाबीन, भुईमूग या पिकांचे भाव वाढतील, अशी आशा आहे.(Soyabean Market)