Cotton Rate: कापसाचे भाव यंदा तरी वाढतील का? समोर आली मोठी माहिती

Cotton Rate: गतवर्षीच्या कापसाला अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्याचे दिसून आले, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता 2024 च्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कापसाच्या किमतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून ते मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खान्देशातील जळगाव जिल्हा कापूस उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कापूस पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेले नाही.

शेतकऱ्यांना पिकाचा खर्चही वसूल होत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांत बाजारात आलेल्या कापसाला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या हंगामात शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळणार का, हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार यंदाही कापसाच्या बाजारभावावर दबाव राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खरेतर, कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात, जसे सोयाबीनच्या बाबतीत.

या महिन्यात, यूएस डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर (USDA) ने अद्ययावत कापूस उत्पादन अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, यूएस कापूस उत्पादन 2024-25 मध्ये 3.5% वाढण्याचा अंदाज आहे. 2019-20 नंतर या वर्षी सर्वाधिक उत्पादन होणार असल्याचे दिसून येत आहे.Cotton Rate

ब्राझील आणि अमेरिकेतील वाढत्या कापूस उत्पादनामुळे जागतिक कापूस उत्पादनाला चालना मिळेल आणि कापसाच्या बाजारभावावर दबाव येईल. अहवालानुसार, जागतिक कापसाच्या किमती तिसऱ्या वर्षी घसरतील.

लाडकी बहीण योजनेचा 3 रा हफ्ता जारी; या तारखेला होणार खात्यात 4500 जमा

तथापि, यावर्षी भारतातील कापूस उत्पादन 6.5% कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन कमी असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, भारतीय कापूस प्रत्यक्षात बाजारात आल्यावर त्याला भाव कसा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.Cotton Rate

Leave a Comment

Close Visit Marathinews360